‘आरटीई’ प्रवेश नोंदणीसाठी आणखी दोन दिवसांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

शनिवारी रात्रीपर्यंत आठ हजार ५४९ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख सहा हजार ६०१ विद्यार्थी क्षमता निर्माण झाली आहे, तर पुणे शहर व जिल्ह्यातील ८९६ शाळांची नोंदणी झाली असून, १५ हजार ६९१ विद्यार्थांचा प्रवेश होऊ शकतो. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करण्याची मुदत होती.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ केली आहे, त्यामुळे सोमवारपर्यंत (ता. १०) नोंदणी करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी रात्रीपर्यंत आठ हजार ५४९ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख सहा हजार ६०१ विद्यार्थी क्षमता निर्माण झाली आहे, तर पुणे शहर व जिल्ह्यातील ८९६ शाळांची नोंदणी झाली असून, १५ हजार ६९१ विद्यार्थांचा प्रवेश होऊ शकतो. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करण्याची मुदत होती. परंतु, शासनाकडून पैसे मिळत नसल्याने अनेक शाळांनी यात भाग न घेण्याचा पवित्रा घेतला होता. नोंदणी कमी झाल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देऊन ८ फेब्रुवारीला ही मुदत संपणार होती. तरीही सुमारे एक हजार शाळांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more days for RTE admission registration