आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

कोरोना विषाणूंच्या आणखी दोन संशयित रुग्णांना पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल करण्यात आले, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

पुणे - कोरोना विषाणूंच्या आणखी दोन संशयित रुग्णांना पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल करण्यात आले, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये प्रवास करून आलेल्या दोन तरुणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे या दोघांना डॉ. नायडू रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्या व्यतिरिक्त दोन रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये विषाणूंचा संसर्ग आढळला नसल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे डॉ. नायडू येथील विलगीकरण कक्षात सध्या चार संशयित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. त्यापैकी शांघाय येथून प्रवास करून आलेल्या ४२ वर्षीय आणि दुसऱ्या २७ वर्षांच्या दोन पुरुषांना रविवारी दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू आहे. ६ हजार ४३२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधित देशांमधून प्रवास करून आलेल्या राज्यातील ७२ रुग्णांच्या प्रकृतीची नियमित चौकशी करण्यात येत असून, त्यापैकी या विषाणूंच्या संसर्गाची लक्षणे दिसणाऱ्या १७ रुग्णांना पुणे, मुंबई येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more suspected coronavirus, patients in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: