Pune Crime : भाजी विक्री व्यवसायाच्या वाद? कात्रज येथे डोक्यात वीट घालून खून

भाजी विक्रेत्याच्या डोक्यात विटेने मारहाण करून खून केल्याची घटना कात्रज परिसरात घडली.
murder
murderesakal

पुणे - भाजी विक्रेत्याच्या डोक्यात विटेने मारहाण करून खून केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाने स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ भुयारी मार्गात अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केला.

दत्तनगर बस थांब्याजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी विलास जयवंत बांदल (वय ५५, रा. त्रिमूर्ती रेसिडेन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) यांच्या डोक्यात वीट घालून खून केला. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनामागचे अद्याप कारण समजू शकले नाही.

तपासात भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अभिषेक बांदल (वय २४) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी करीत आहेत.

शिवीगाळ केल्याने खून, आरोपी पोलिस ठाण्यात हजर -

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाने अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या विटेने मारहाण करून खून केला. मृताची (वय ३५) ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी गौतम घनश्याम तुरुकमारे (वय २८, रा. मार्केट यार्ड, मूळ रा. सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम हा लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ भुयारी मार्गातून निघाला होता. त्याचा अनोळखी व्यक्तीला धक्का लागला. त्यावर त्या व्यक्तीने गौतमला शिवीगाळ केली. त्यामुळे गौतमने रागाच्या भरात अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर सिमेंटच्या विटेने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाला. याबाबत पोलिस कर्मचारी किशोर पोटे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com