‘पीएमआरडीए’तील पाण्यासाठी दोन पर्याय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीसाठी पाण्याचा कोटा मंजूर करून घेण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीसाठी पाण्याचा कोटा मंजूर करून घेण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पुरविले जाणारे पाणी बोगद्याच्या माध्यमातून पुरविणे आणि त्यातून बचत होणारे अडीच टीएमसी पाणी उपलब्ध करून घेणे अथवा हद्दीतील प्रत्येक धरणात पीएमआरडीएसाठी काही पाणीसाठा आरक्षित करणे, अशा दोन पर्यायांचा त्यामध्ये समावेश आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पीएमआरडीएच्या कामकाजाच्या आढाव्यासाठी बैठक घेतली. तीत पीएमआरडीएच्या हद्दीसाठी पाणी कोटा मंजूर करण्यासंदर्भात देखील चर्चा झाली होती. भविष्यात आवश्‍यक असलेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबाबतचा आराखडा सादर करण्याचा आदेश दिला होता.

पाण्याची गरज वाढणार
  पीएमआरडीए हद्दीतील लोकसंख्या पंधरा लाख 
  २०३१ पर्यंत लोकसंख्या ४० लाखांवर 
  आणखी दहा वर्षांनी चार टीएमसी पाण्याची गरज

पहिला पर्याय
  खडकवासला धरणातून बोगद्यातून पाणीपुरवठा करणे
  तसे केल्यास बाप्पीभवनामुळे होणारी पाण्याची तूट भरून निघेल
  त्यातून वर्षभरात सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचेल

दुसरा पर्याय 
  पीएमआरडीएतील धरणातून पाणीसाठी आरक्षित करावा 
  धरणाच्या ठिकाणी पीएमआरडीएकडून प्रकल्प उभारण्यात येईल
  या प्रकल्पातून वस्ती वाढणाऱ्या भागाला प्रथम पाणीपुरवठा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two options for water in PMRDA