बालवाडीतील मुलीने वाचविली दोन घुबडाची पिले

दत्ता म्हसकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जुन्नर - बेलसर ता.जुन्नर येथील बालवाडीच्या शाळेतील वर्षना नावाच्या मुलीने घुबडाचे पिलू पाहून शिक्षकांना यांबाबत सांगितले. संजय गर्भे यांनी या पिलाबाबत वनरक्षक रमेश खरमाळे यांना कळविले. खरमाळे यांना तेथे दोन पिले अढळली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या व्हरांड्यात एक पिलू मान टाकलेल्या अवस्थेत होते. हे पिलू जेथे अढळले ती जागा वर्षना या विद्यार्थिनीने दाखविली असता, तेथे दुसरे पिलू देखील अढळले. झाडावरुन ही पिले खाली पडली असवीत असे खरमाळे यांनी सांगितले.  

 ''पिल्लांची आई झाडावर जीवाच्या आकांताने ओरडत होती. एक पिल्लू झोपले होते तर दुसरे आईच्या कुशीत जाण्यासाठी धडपडत होते. आई मात्र आक्रोश करत होती. या झाडावरून त्या झाडावर फिरताना दिसत होती''. असे खरमोळे म्हणाले. दोन्ही पिल्ले एकत्र ठेवल्यानंतर त्यांना त्यांची आई घेऊन जाईल म्हणून वाट पाहत होते. दरम्यान एक मांजर त्यांच्यावर झडप घालणार असल्याचे लक्षात आल्यावर त्या पिलांना पाण्याच्या टाकिवर ठेवले असता, दोन्ही पिले उडण्याचा प्रयत्न करत परत जमिनिवर आली. त्यानंतर त्यांची आई देखील त्यांच्या दिशेने झेपावली आणि दोन्ही पिलांची आईशी भेट झाली आणि सगळ्यांनी सूटकेचा निश्वास टाकला.

''आई आणि पिलांची भेट होतानाचा चित्तथरारक अनुभव मुलांनीही घेतला. पिलांची आई उंच टाकीवरून ओरडून आपल्या पिल्लांना आवाज देत त्यांचे सात्वन करत होती. जणू सांगत होती काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी. तिचा आवाज ऐकून मरणासन्न अवस्थेत असलेल्या बाळात देखील प्राण संचार झाल्याचे दिसून आले. त्याची हालचाल दिसून लागली व ते एकदम उभे राहिले. हा अनुभव बघणे मुलांसाठी देखील खासच होता.''
रमेश खरमाळे

वर्षना या बालवाडीतील मुलिने वेळीच या घुबडाच्या पिलाची माहिती दिल्याने या दोन्ही पिलांचे जीव वाचले. त्याबद्दल तिलाही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Two owl pigeons saved by kindergarte girls

टॅग्स