पुणे : कोयता, बांबू घेऊन दहशत पसरविताना पाहिले म्हणून तिघांना जबर मारहाण

Two people and boy were beaten up for allegedly spreading terror
Two people and boy were beaten up for allegedly spreading terror

पुणे : कोयता, बांबू घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत नागरीकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे पाहिल्याच्या कारणावरुन दोघांनी एका तरुणासह दोघांना जबर मारहाण करीत त्यांना लुटले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सात वाजता येरवडा येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांना अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय 21) व राकेश उर्फ सुरेश साळवे (वय 22, दोघेही रा.यशवंत नगर, येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय गोरखे (वय 25, रा. कटकेवाडी, वाघोली) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरखे याच्या येरवड्यातील यशवंतनगर परिसरात घरे आहेत. संबंधीत घरे त्याने भाड्याने दिले आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता तो त्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरुंकडून भाडे घेण्यासाठी आला होता. त्यावेळी निलेश व राकेश हे दोघेजण लक्ष्मीमाता मंदिरासमोर हातामध्ये कोयता, बांबू घेऊन शिवीगाळ करीत दहशत निर्माण करीत होते. तेथुन जात असताना फिर्यादीने त्यांना पाहिले. त्याचा राग आल्याने दोघांनी फिर्यादीस थांबवून त्यास कोयत्याचा धाक दाखवित हाताने व बांबुने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील पैसे व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेनंतर फिर्यादी याने त्याचा मोबाईल आरोपींकडून परत मागितला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस पुन्हा मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबरोबर कामावरुन सुट्टी झाल्यामुळे घरी जात असणाऱ्या समीर जमीर कुरेशी यांना देखील मारहाण करीत धमकाविले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली. 
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com