उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु

उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु

उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु

एकजण गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल

पुणे : उरुळी कांचन येथील तळवडे चौक परिसरात शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यु झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. गोळीबाराची ही घटना टोळीयुद्धातुन झाली असण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: सणासुदीच्या काळात FDA ची करडी नजर; डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आदेश

संतोष संपतराव जगताप याच्यासह आणखी एकाचा मृत्यु झाला आहे. तर आणखी एकजण जखमी असून उपचार सुरू आहेत. जगताप व त्याचा साथीदार गंभीर जखमी आहेत. तर विरुद्ध टोळीतील एकजण गंभीर जखमी झाला आहे. संतोष जगताप, त्याच्या अंगरक्षकासह शुक्रवारी दुपारी तळवडे चौकात थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्‍याने त्यांच्या धारदार शस्त्रांनी वार करण्याबरोबरच त्यांच्यावर गोळीबारही केला, त्यावेळी जगतापला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेतच त्याने प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, त्यामध्ये टोळक्‍यातील एकाला गोळी लागून त्याचा मृत्यु झाला. जगताप यास जखमी अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यु झाला. या घटनेत आणखी एकजण जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जगताप व त्याच्या साथीदाराची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जगताप हा अप्पा लोंढे टोळीचा सदस्य आहे. त्यांच्या विरुद्ध टोळीचे जगताप याच्याशी वाद होते. वाळुची ठेकेदारी व अन्य कारणामुळे, तसेच पुर्व वैमनस्यातुन हा गोळीबार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Two People Killed Shooting Sand Trader Santosh Jagtap Uruli Kanchan Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..