पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारे जेरबंद

नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी वाघोली, रांजणगाव एमआयडीसीमधून अटक केली.
 crime
crimeesakal
Summary

नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी वाघोली, रांजणगाव एमआयडीसीमधून अटक केली.

पुणे - नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये (Pune Railway Station) ठेवल्याची अफवा (Rumor) पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी (Police) वाघोली, रांजणगाव एमआयडीसीमधून अटक (Arrested) केली. मंगळवारी (दि. ३ मे २०२२) सायंकाळी चारच्या दरम्यान पुणे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगून आरोपीने सात कोटी रुपयांची मागणी केल्याची घटना घडली होती.

सूरज मंगतराम ठाकूर (वय ३०, रा. नशेली, ता. मुखेरिया, जि. होशियार, पंजाब) आणि करण भिमाजी काळे (वय ३३, रा. नावरे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) इरफान शेख यांनी चार पोलीस पथकांच्या माध्यमातून तपास सुरू केला. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणच्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, लक्ष्मी कांबळे, सुनील कदम, अमरदीप साळुंके, संतोष जगताप, सचिन राठोड, रुपेश पवार, अमित गवारी, उदय चिले, संदीप काटे, माधव केंद्रे पन्हाळकर यांनी वाघोलीतून एकाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन मोबाईल मिळून आले. त्या मोबाईलवरून दहशत पसरविणारा कॉल केल्याचे त्याने कबुल केले. त्यानुसार त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन दोघांना अटक केली.

फेक कॉल करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही दहशत पसरविणारे फेक कॉल करू नयेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक सदानंद गं. वायसे-पाटील यांनी केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com