Manchar News : मंचर जवळ निघोटवाडी पुलाजवळ दोन पिस्तुले, चार काडतुसे जप्त; परराज्यातील आरोपीला अटक, एका आरोपीचा शोध सुरु

निघोटवाडी पुलाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर थांबली असून, त्याच्याकडे पिस्तुले व जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
manchar crime

manchar crime

sakal

Updated on: 

मंचर - निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील पुलाजवळ सापळा रचून मंचर पोलिसांनी अमजद अब्दुल सत्तार अन्सारी (वय-५४, रा. लोणार गल्ली, मंचर; मूळ रा. कासमपूर गढी, ता. धामपूर, जि. बिजनोर) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले व चार जिवंत काडतुस, दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com