पुणे - मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दोन्ही पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले.