Crime
ESakal
पुणे - शहर पोलिस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेत कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्या प्रकरणात कोल्हापूरमधील एका दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हे जोडपे महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे सचिव शिवाजी साळुंखे यांचे नातेवाईक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.