पुणे - शहरात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना प्राण गमवावे लागले. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती परिसरात या घटना घडल्या..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील प्रदीप भीमराव यादव (वय-७६, रा. सैनिकवाडी, वडगावशेरी) हे बुधवारी (ता. १०) पहाटे पावणेचारच्या सुमारास सायकलवरून निघाले होते. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात भरधाव मोटारीने त्यांना जोरात धडक दिली..या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा शंतनू यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दुसरी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे घडली. दौंड येथील रहिवासी युसूफ करीम शेख (वय-७०) हे कामावरून घरी पायी निघाले होते. त्यावेळी रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार अक्षय सुनील बनकर (वय-२५, रा. बनकरवाडी, ता. इंदापूर) याने भरधाव दुचाकी चालवून त्यांना धडक दिली..या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा वसीम शेख (रा. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.