

उरुळी कांचन : कोयता जवळ बाळगणारे दोन संशयित इसमास लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अदित्य मच्छिंद्र काळभोर (वय १८ वर्षे, रा. टाळकुटे वाडा, टाक्याचा माळ, रायवाडी, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे), आप्पा मारुती पवार (वय १८ वर्षे, रा. टाक्याचा माळ, रायावाडी, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील टाक्याचा माळाशेजारील डोंगरावरील मंदिराजवळ दोन इसम जवळ कोयते घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
सदरची बातमी मिळताच त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे आणि त्यांचे पोलीस सहकारी पोचले असता वरील दोनही आरोपी संशयितरित्या थांबलेले आढळले. त्यांची तपास पथकाकडून अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेस लपवलेले दोन लोखंडी कोयते मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.
वरील दोन आरोपींविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२३/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार सातपुते, गायकवाड, सायकर, जाधव, कुदळे, वीर, पाटील, शिरगीरे या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.