esakal | चिंचवडगाव चोरीप्रकरणी दोघांना अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

two thieves arrest in chinchwad

चिंचवडगाव चोरीप्रकरणी दोघांना अटक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या परिसरातील दुकानांमधील चोरीप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 87 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

सोमनाथ संजय खरात (वय 18, रा. चिंचवड) आणि सलीम कालू शेख (रा. वेताळनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंदिर परिसरातील सचिन छाजेड यांच्यासह अन्य सात दुकानांमधून चोरट्यांनी तांबे, पितळ, पांढऱ्या धातूच्या मूर्ती असा माल 11 ऑगस्टला चोरून नेला होता. त्यानंतर 14 ते 15 ऑगस्टदरम्यान चिंचवड येथील केशवनगरमधील एका दवाखान्यातून 35 हजार रुपये किमतीचा टॅब चोरीला गेला होता. या दोन्ही घटनांचा तपास चिंचवड पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते. चिंचवडस्टेशन येथे एकजण मूर्तीची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ याला ताब्यात घेतले. चौकशीत अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी टॅब आणि 52 हजार रुपये किमतीच्या धातूच्या मूर्ती असा ऐवज जप्त केला. 

loading image
go to top