दोन हजार वर्षांपूर्वीचे समुद्रशंख जुन्नरमध्ये

जुन्नर - बापूजी ताम्हाणे यांना आढळलेले इ.स. पूर्व पहिल्या शतकातील समुद्रशंखाचे अवशेष.
जुन्नर - बापूजी ताम्हाणे यांना आढळलेले इ.स. पूर्व पहिल्या शतकातील समुद्रशंखाचे अवशेष.
Updated on

जुन्नर - ऐतिहासिक जुन्नर शहराच्या परिसरात सातवाहनकालीन वापरात येणाऱ्या अनेक वस्तू मिळून येत आहेत. गोळेगाव (ता. जुन्नर) येथील प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना इ.स. पूर्व पहिल्या शतकातील समुद्रशंखाचे भग्न अवशेष नुकतेच आढळून आले. 

जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन बौद्ध लेण्यांच्या मोक्‍याच्या जागी इ.स. पूर्व पहिल्या शतकात मानवी वस्ती असलेल्या भागात समुद्रशंखापासून बांगड्या व अन्य वस्तू बनविल्यानंतर उरलेले भग्न अवशेष टाकून दिले जात असत. परिसरात गेल्या तीन-चार दशकात झालेल्या उत्खननात सातवाहनकालीन विविध वस्तू मिळाल्या आहेत. यात बांगड्याचे अवशेष, कानातील डुल, गळ्यातील पदके, केशभूषेतील नीटनेटकेपणा दाखविणारी प्रतिकृती आदींचा समावेश आहे. त्यामुळे जुन्नर परिसरात सातवाहनकालीन वस्ती असल्याचे निश्‍चित होण्यास मदत झाली आहे. नुकतेच ताम्हाणे यांना समुद्रशंखाचे भग्न अवशेष नुकतेच आढळून आले. शंखापासून केलेल्या बोटातील अंगठ्या देखील मिळाल्या असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

सातवाहनकालीन वस्तू
जुन्नरच्या जुन्या बसस्थानकामागे आगर येथे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सातवाहनकालीन वस्तू मिळाल्या होत्या. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने सन २००८ व ०९ मध्ये आगर येथे केलेल्या उत्खननात मूर्ती, मातीची भांडी, नाणी, शिंपल्यापासूनचे दागिने आढळून आले होते. सन २०११ मध्ये जुन्नरजवळील दिल्ली पेठ येथे उत्खननात भाजलेल्या मातीच्या मूर्ती, बांधकामाचे अवशेष, पाटा, वरवंटा, कच्च्या लोखंडाचे तुकडे, मातीचे मणी, शंखाचे अवशेष मिळाले होते. तसेच, सौराष्ट्र क्षत्रपाची व अकबरची नाणीही मिळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com