esakal | नगदवाडी येथे दोन उदमांजरांना विहिरीतून जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

uadmanjar

नगदवाडी येथे दोन उदमांजरांना विहिरीतून जीवदान

sakal_logo
By
सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी : जुन्नर (junnar) तालुक्यातील नगदवाडी (Nagadwadi) येथील मधुकर महादेव कोकणे यांच्या विहिरीतुन दोन उदमांजरांना वनविभागाने सुखरूप बाहेर काढुन जीवदान दिले. मधुकर कोकणे यांना शनिवारी (ता.१७) सकाळी त्यांच्या विहिरीत दोन उदमांजर पडल्याचे निदर्शनात आले होते. (Two Udmanjars rescued well at Nagadwadi)

त्यानंतर त्यांनी ओतुर वनविभागाचे अरुण देशमुख यांना संपर्क साधला असता अरुण देशमुख हे जुन्नर बिबट रेस्क्यूचे सदस्य दीपक माळी व मंगल जाधव यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दीपक माळी यांनी स्वतः दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरत दोन्ही उदमांजरांना सुखरूप बाहेर काढले आणि तेथेच निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिले. जुन्नर रेस्क्यु टीमचे करण जाधव, अजिंक्य भालेराव व स्थानिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत मदत केली.

loading image