चालकाला दुचाकीसहीत टँम्पोत टाकून कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

वडगाव शेरी : रस्त्याच्या बाजुला दुचाकीवर बसलेल्या एका युवकाला पोलिसांनी केलेल्या विचीत्र आणि बेकायदा कारवाईला सामोरे जावे लागले. हा युवक विमाननगरमधील एका रस्त्याच्या बाजुला दुचाकीवर बसलेला असताना नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणारे वाहन तेथे आले. पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी या युवकाची त्याच्या दुचाकीसहीत उचलबांगडी केली. मात्र काही जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या या दादागिरीचे छायाचित्रण केल्याने हा प्रकार समोर आला. 

वडगाव शेरी : रस्त्याच्या बाजुला दुचाकीवर बसलेल्या एका युवकाला पोलिसांनी केलेल्या विचीत्र आणि बेकायदा कारवाईला सामोरे जावे लागले. हा युवक विमाननगरमधील एका रस्त्याच्या बाजुला दुचाकीवर बसलेला असताना नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणारे वाहन तेथे आले. पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी या युवकाची त्याच्या दुचाकीसहीत उचलबांगडी केली. मात्र काही जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या या दादागिरीचे छायाचित्रण केल्याने हा प्रकार समोर आला. 

विमाननगर भागात येरवडा वाहतुक पोलिसांकडून नो पार्किंगमधील दुचाकीवर कारवाई करताना अऩेकदा दुजाभाव केला जातो. दत्तमंदिर चौक, ईडन गार्डन, रोझरी लेन, सांबार हॉटेल, विमाननगर चौक आदी ठिकाणी पोलिस कारवाईकडे दुर्लक्ष करतात. पोलिस नागरिकांशी सोजन्याने वागत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. नेमका या आरोपांना पुष्ठी देणारा प्रकार विमाननगरमध्ये घडला.

बुधवारी (ता. 30) दुपारी हा युवक विमाननगर येथील तवा स्ट्रीट या हॉटेलसमोर विषम तारखेस पार्किंगच्या जागी हा युवक दुचाकीवर बसला होता. त्यावेळी वाहतुक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी त्यास हटकले. त्याने मी येथे दुचाकीवर थांबलो आहे. गाडी पार्किंग केलेली नाही, असे पोलिसांना सांगितले. वाहन उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचे न ऐकता त्यास त्याच्या गाडीसहीत टॅम्पोत टाकले. नंतर पुढे जाऊन त्यास उतरव्यात आले.

वाहतुक पोलिस निरीक्षक बी. जी. मिसाळ म्हणाले, अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे आहे.  कारवाईवेळी उपस्थित सहाय्यक फौजदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर कारवाई होईल. तसेच ठेकेदाराचे कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करू. मी या प्रकरणाची माहिती घेतली. सदर युवकाची ती दुचाकी नव्हती. तो फक्त बसला होता. तसेच त्याने पोलिसांना अपशब्द वापरल्याचे आज सहाय्यक फौजदारांनी सांगितले, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.             

मात्र अपशब्द वापरले तर पोलिसांनी त्या युवकावर कालच कायदेशीर कारवाई का केली नाही, असे विचारल्यावर मिसाळ म्हणाले, त्यावेळी ड्युटीवर असणाऱे पोलिस कर्मचारी शेख यांनी युवका विरोधात तक्रार द्यायला हवी होती. दुचाकीच्या मालकाला ई चलनद्वारे दंड करण्यात आला आहे. याविषयी वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने म्हणाले, पोलिस कायद्याचे रक्षक आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. या प्रकारात मात्र पोलिसांनी अगदी विरोधात भुमिका घेऊन कायदा मोडला आहे म्हणून दोषींवर कारवाई व्हावी.

 

अजिंक्य रिक्षा संघटनेचे नितीन भुजबळ म्हणाले, वाहन उचलण्याचा ठेका असणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी अनेकदा नियम मोडतात. नगर रस्त्याने अनेक व्यावसाय़िक वाहने अनधिकृत थांबतात. परंतु येरवडा वाहतुक पोलिस अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे.                      
 

Web Title: two wheeler driver discarded in tempo to take action