खंडणीखोर दोन महिला गेले पाच महिने लागेनात पोलिसांच्या हाती; वाचा सविस्तर

Maharashtra-Police
Maharashtra-Police

पुणे - कुख्यात छोटा राजनच्या नावाचा वापर करुन बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाखांची मागणारी ‘मास्टर माइंड’ महिला पाच महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागेना. याबरोबरच खंडणीच्याच प्रकरणात ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल असलेली महिलाही पोलिसांना अद्याप सापडलेली नाही.

शहरात जानेवारीपासून खंडणीची मोठी प्रकरणे पुढे येण्यास सुरुवात झाली. खंडणीखोरांकडून ५० लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंत मागणी केली जात आहे. डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, सराफ, व्यापारी व अन्य व्यावसायिक खंडणीखोरांचे सावज ठरले आहेत. बहुतांश प्रकरणांत खंडणी न दिल्साय खोटे गुन्हे दाखल करुन बदनामी करण्याची धमकी देण्यात आली आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यात एका बांधकाम व्यावसायिकास त्याचा कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी प्रियदर्शनी निकाळजे नावाच्या महिलेने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी २५ लाख रूपये घेताना तिच्या साथीदारांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. प्रियदर्शनी हिने आपण गँगस्टार छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगत संबंधित व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. तसेच त्याच्या डोक्यावर पिस्तुल रोखून दहाच्या दहाच्या दहा गोळ्या घालेन, अशी धमकी दिली होती. चार महिन्यांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत; परंतु अद्याप ती सापडलेली नाही. मधल्या काळात तिने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता; परंतु तांत्रिक कारणामुळे तिने तो अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, फुरसुंगीतील दोन डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडून पावणेसहा लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी रंजना तानाजी वणवे हिच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. तिने यापूर्वीही साथीदारांच्या मदतीने बार्शी तालुक्यातील डॉक्टरांना पळवून नेऊन खंडणी वसूल केली आहे. खंडणीच्या या दोन्ही प्रकरणांत अन्य आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केले. मात्र खंडणीच्या मुख्य सुत्रधार असणाऱ्या महिलांपर्यंत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

खंडणीसाठी खुनाचे प्रकार 
खंडणीसाठी आतापर्यंत गुन्हेगार धमकी, मारहाण, अपहरण किंवा पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत होते. मात्र खडक, बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणामध्ये गुन्हेगारांनी खंडणीसाठी दोन व्यावसायिकांचा खून करण्यापर्यंत मजल मारली. तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील खडकवासला येथे ५० हजार रूपयांच्या खंडणासाठी एका इलेक्ट्रिक साहित्यनिर्मिती करणाऱ्या व्यावसायिकावर मे महिन्यात गोळीबार झाला होता. यात व्यावसायिकाचा मित्र जखमी झाला होता.

खंडणी प्रकरणातील प्रियदर्शनी निकाळजे हिचा आम्ही शोध घेत आहोत. या व अन्य प्रकरणात अन्य आरोपी अटक केलेले आहेत. त्यांच्या सुत्रधार असणाऱ्यांनाही लवकरच अटक केले जाईल.
- राजेंद्र मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com