पुण्यात पीएमपी बसचा थरार! ब्रेक फेल झाला अन् त्या दोघी...

Two women injured in Accident PMP bus due to brake Fail at Paud Road Pune
Two women injured in Accident PMP bus due to brake Fail at Paud Road Pune

पुणे : ऐन गर्दीच्यावेळी पीएमपीएल बसचा ब्रेक निकामी झाल्याने भरधाव बसने दोन दुचाकीस्वार महिलांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोघी दुचाकीस्वार महिला सुदैवाने बचावल्या. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याबरोबरच बसचालकाने तीन कार, रिक्षा व आणखी एका दुचाकीला उडविले. हा अपघात गुरूवारी सायंकाळी साडे सहा वाजता पौड रस्त्यावर परमहंसनगर परिसरात घडली. दरम्यान, बसचालकास अटक करण्यात आली आहे. 

पेटीएम अपडेट करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरूच

शची दंडवते (वय 20), आदिती कुलकर्णी (वय 40, दोघीही,रा. कोथरूड) अशी या अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी दंडवते यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी पीएमपी बसचालक बापू किसन आवटे असे गुन्हा दाखल झालेल्या बसचालकाचे नाव आहे.

Video : बाप आहे राव ही पोर! 450 फूट तानाजी कड्यावर सरसर चढली 6 वर्षांची ध्रुवी

दुचाकीस्वार दंडवते या त्यांच्या दुचाकीवरुन पौड रस्त्यावरील परमहंस नगरकडे जात होत्या. त्याचवेळी कोथरू डेपो ते सुखसागर ही बस परमहंस नगरमधून जात होती. परमहंस नगर परिसरात उतार आहे. त्यावेळी बसचे ब्रेक निकामी झाल्याने भरधाव बसची दंडवते यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर याच बसने आदिली कुलकर्णी यांच्याही दुचाकीला धडक दिली. त्यावेळी दोघीही दुचाकीवरुन खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर बसने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या तीन कार, एक रिक्षा व आणखी एका दुचाकीला धडक दिली. संबंधीत परिसरामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्याकडेला पत्रे लावण्यात आले आहेत. बस पत्र्यावर आदळल्याने तिचा वेग कमी झाला. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक आवटे यास ताब्यात अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. 

पिंपरी : तरुणीला दाखवले नोकरीचे आमिष अन्...

मेट्रो प्रकल्पामुळे पौड रस्ता अरुंद; वाहतूक कोंडीचा प्रश्‍न
पौड रस्त्यावरील मेट्रो प्रकल्पामुळे रस्ता अरुंद झाला आहे. दररोज या ठिकाणाहून लाखो नागरीक नोकरी, काम व शिक्षणानिमित्त वाहनांमधून बाहेर पडतात. मात्र त्यांचा बराचसा वेळ तेथील वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडण्यात जात असल्याची सद्यस्थिती आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत नसल्याने वाहनचालक व नागरिक दोघेही त्रस्त आहेत. त्यातच बिघडणाऱ्या पीएपमी बसमुळे नागरीकांची आणखीनच डोकेदुखी वाढली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com