'ते' दोघेही शेतात गवत काढत होते, अन् मध्येच...

gra.jpg
gra.jpg

पारगाव : पारगाव (ता. आंबेगाव) परिसरात एकाच आठवड्यात शेतात काम करत असताना दोन तरुणांना विषारी घोणस सापाने चावा घेतला. दोनही तरुणांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांचे जीव वाचले आहे.

पुणे, महाराष्ट्र

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

येथील चिचगाई मळ्यात अंकुश केरभाऊ वाघ (वय 40 वर्ष)  हे शेतातील गवत उपटत असताना हाताच्या बोटाला घोणस सापाने चावा घेतला तर येथीलच वाडावस्तीवरील मयुर खंडु ढोबळे (वय 24 वर्ष) हा शेतात काम करताना घोणसने चावा घेतला. दोघांनाही तातडीने नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात नेण्यात आले दोघांनाही वेळीच उपचार  मिळाल्याने दोघांचेही प्राण वाचले आहे.

सध्या पावसाळा सुरु असल्याने जमिनीतील बिळांमध्ये पाणी गेल्याने साप बाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन जुलै महीना हा सापांच्या वीणीचा काळ असतो, त्यामुळे शेतात काम करताना पायात बुट वापरावे, शेतात जाताना हातात काठी घेऊन काठी आपटत पुढे जावे, यामुळे साप दुर जातो. रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा. झोपताना उंच लोखंडी खाटेवर झोपावे. मच्छरदाणीचा वापर करावा तसेच सर्पदंश झाल्यास घाबरुन न जाता त्वरीत डॉक्टरकडे जाऊन उपचार सुरु करावे असे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com