Uber Rickshaw: ‘उबेर’कडून लूटमार, रिक्षाभाड्याचा घोळ; कशी होत आहे प्रवाशांची फसवणूक जाणून घ्या सविस्तर
पुणे, ता. ६ : रिक्षा बुक करताना उबेर कंपनी वेगळा दर दाखविते आणि प्रत्यक्षात मीटरप्रमाणे दर आकारला जात आहे. त्यामुळे रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत. उबेरने रिक्षाचालकांशी केलेल्या करारामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई केली जाईल, अशी भूमिका आरटीओ प्रशासनाने घेतली आहे.
करारात उबेरने म्हटले आहे की, आम्ही सॉफ्टवेअर आधारित सेवा देणारी कंपनी असून ॲग्रीगेटर परवान्याची आवश्यकता नाही. तेव्हा भाडे आकारताना रिक्षाचालक व प्रवासी दोघांनी एकमताने भाडे ठरवावे. मात्र, मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी आणि रिक्षाचालकाला भाडे ठरविण्याचा अधिकार नाही. यावर तोडगा म्हणून प्रादेशिक परिवहन समितीने मीटरवर धावणाऱ्या रिक्षासाठी जे दर ठरविले त्याचाच आधार आता उबेरसाठी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांनी घेतला आहे. रिक्षा बुक करताना ॲपवर प्रवाशांना कोणतेही माहिती दिली जात नाही.
मोबाईल ॲपद्वारे प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीला अद्याप ॲग्रीग्रेटरचा परवाना मिळाला नाही. त्यात उबेरने ‘आम्ही प्रवासी सेवा देणारी कंपनी’ नसून ‘सास’ म्हणजे ‘सॉफ्टवेअर सेवा देणारे आहोत’ अशी पळवाट काढली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवासी ॲपने रिक्षा बुक करतो. त्यामुळे तेथील दराप्रमाणे पैसे घेतले पाहिजे. मात्र, कंपनीने जबाबदारी झटकत रिक्षाचालक व प्रवाशांना दर ठरविण्याचे अधिकार दिले असून, ते पूर्णपणे बेकायदा आहे.
अशी ही लपवाछपवी
रिक्षा बुक करताना मीटरप्रमाणे दर आकारणार, असे काहीही उबेरने ॲपवर दिलेली नाही
रिक्षाचालकांना भाडे द्यावे एवढाच मजकूर उपलब्ध
रिक्षाचालक मीटरप्रमाणे दराची आकारणी करतो; तरी प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी स्वतःचे दर दाखवितो
असे आहेत रिक्षाचे दर
उबेर : ९ ते १० रुपये प्रति किलोमीटर
ओला : १३ ते १४ रुपये प्रति किलोमीटर
मीटर : १७ रुपये प्रति किलोमीटर
(या दरात ५० टक्के वाढ व ५० टक्के कमी करण्याचा अधिकार कंपनीला आहे)
ही तर प्रवाशांची फसवणूक
मोबाईल ॲपवरचा दर वेगळा व मीटरचा दर वेगळा
दर मीटरप्रमाणे द्यावा याचा कंपनीकडून उल्लेख नाही
प्रवाशांनी हात दाखवून रिक्षा थांबवली असेल अथवा विना ॲपने रिक्षाने प्रवास केला त्याच वेळी मीटरने भाडे आकारण्याचा रिक्षा चालकाला अधिकार
मोबाईल ॲपवरून रिक्षा बुक झाली असेल तर त्यावेळी कंपनीने लागू केलेले दरच प्रवाशांकडून घेणे अपेक्षित आहे. रिक्षाचालक जर तसे करत नसेल तर त्यांच्यावर संबंधित कंपनीने कारवाई करणे अपेक्षित आहे. आरटीओ प्रशासनाकडे तशी तक्रार प्राप्त झाल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार जी उचित कारवाई असेल ती केली जाईल.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकार, पुणे
उबेर आणि रिक्षा चालकांमध्ये करार झाला असून त्यात दर ठरविण्याचे अधिकार प्रवासी व रिक्षा चालक यांना देण्यात आले आहे. मीटरप्रमाणे दर आकारले जाईल ही माहिती प्रवाशांना देणे ही कंपनीची जवाबदारी आहे.
- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.