

महाळुंगे पडवळ, ता. ८ : हॅलो, युको बॅंक कळंब शाखा से बात कर रहा हू, आप का बॅंक अकाऊंट ब्लॉक हो गया है, आपका अकाऊंट आजही बंद हो गया है, चालू करणे के लिए मै आपको फॉर्म भेजता हू, आप मुझे फॉर्म फिल कर के व्हॉटसॅप पे भेज दो, असे बनावट कॉल युको बॅंकेच्या १५० ते २०० खातेदारांना आले आहेत. यातून २० ते २५ ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांचे प्रमाण अधिक आहे.
कळंब (ता. आंबेगाव) येथे युको बँकेची शाखा आहे. या बँकेत लौकी, चांडोली बुद्रुक, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, महाळुंगे पडवळ, कळंब, चांडोली बुद्रुक, जाधववाडी आदी गावातील जवळपास ३० ते ३५ हजार खातेदार आहेत. गेल्या एक महिन्यापासून खातेदार बँकेत येऊन तुम्ही फोन केल्याची विचारणा करत आहे. बँक तुम्हाला कोणालाही फोन करत नाही, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा, अशी सूचना बँकेकडून खातेदारांना दिली जात असल्याची माहिती बँकेच्या अधिकारी वर्गाने दिली. याबाबत सुहास अशोक भालेराव यांचीही फसवणूक झाल्याने त्यांनी मंचर पोलिसांकडील सायबर विभागाकडे तक्रार दिली आहे.
“फसवणूक करून बँक खात्यांमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढल्याने बँकेचे खातेदार प्रचंड हैराण झाले आहेत. सायबर चोरटे रोज नवनवीन क्लृप्त्या शोधून लोकांना जाळ्यात ओढत आहेत. मलाही दोनदा बनावट कॉल करून गंडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. माझ्यासारखे गावातील जवळपास १५० ते २०० बनावट कॉल आले आहेत. या कॉलने खातेदार हैराण झाले आहेत.’’
-डॉ. सचिन भालेराव, खातेदार
“ग्राहकांनी ऑनलाइन बनावट कॉलद्वारे सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युको बँकेशी संपर्क साधावा. तुमचे बँक खाते, डेबिट/क्रेडीट कार्ड आणि नेट बँकिंग तत्काळ ब्लॉक करा. युको बँकेच्या १८००१०३०१२३ येथे कॉल करा. किंवा UCO SPGRS PORTAL वर तक्रार नोंदवू शकता. युको बँक कधीही फोन कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुमचा ओटीपी, पिन, सीव्हीव्ही पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती मागवत नाही. अशा कोणत्याही बनावट कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका. तुमची माहिती देऊ नका.
किशोर काळे, शाखाधिकारी, युको बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.