
पुणे : हवाई वाहतूक मंत्रालयाच्या ‘उडान ५.५’ योजनेत सागरी विमान आणि हेलिकॉप्टरचाही समावेश झाला आहे. येत्या डिसेंबरअखेर १५० मार्गांवर सागरी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या काळात या दोन्ही सेवांचा वापर वाढणार आहे. याशिवाय ‘एमएडीसी’ने (महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ) राज्यातील ८ ठिकाणांहून सागरी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण व हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर केला आहे. यात पुण्यातील पवना धरणाचा समावेश आहे.