Udan Scheme
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - सामान्य माणसांच्या विमान प्रवासाच्या स्वप्नाला ‘पंख’ देण्याचे काम केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेने केले. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुणे विमानतळाहून चार शहरांना या योजनेंतर्गत सेवा सुरू असून, यातील तीन शहरे महाराष्ट्रातील आहेत. ‘उडान’मुळे छोटी शहरे विमानसेवेने पुण्याशी जोडली गेली. मागील चार वर्षांत पुण्याहून या योजनेंतर्गत ६ हजार ३०० विमानांची उड्डाणे झाली आहेत.