Otur News : उदापूरला श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रेनिमित्त फिरते गाडीबगाडाचा थरार

उदापूर, ता. जुन्नर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवीची यात्रा कालाष्टमी निमित्त बुधवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली.
shri kalbhairavnath and muktadevi yatra
shri kalbhairavnath and muktadevi yatrasakal

ओतूर - उदापूर, ता. जुन्नर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवीची यात्रा कालाष्टमी निमित्त बुधवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या फिरत्या गाडीबगाडाचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दि केली असल्याची माहिती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे, खजिनदार प्रभाकर शिंदे, सचिव शशिकांत शिंदे, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे व सरपंच सचिन आंबडेकर यांनी दिली.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले कि, बुधवारी कालाष्टमीला सकाळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाला ५१ ग्रामस्थानी अभिषेक केला. त्यानतंर श्री काळभैरवनाथ पुजाऱ्याकडील काळभैरवनाथाच्या पोषाखाची व मुखवट्याची गावातुन वाजतगाजत पारंपारिक पध्दतीने लेझीम खेळत व ढोल ताशाच्या गजरात मांडवडहाळ्या सह मंदिरा पर्यत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाड्या मांडवडहाळे घेवून मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या. त्यानतंर देवाचा विधीवत पोशाख करून व पुजा व आरती केली गेली. त्यानंतर भाविका कडुन नवसाचे शेरणी वाटप करण्यात आले.

याच दरम्यान गावाती मारुती मंदिरासमोर गाडी बगाड आवळण्याचे काम चालु होते. गाडी बगाड गावचा मुख्य चौक असलेल्या पाराजवळ चार वाजेदरम्यान आल्यानतंर प्रत्येक भावकिला व पाहुण्याना ठराविक वेळामध्ये ते फिरविण्यासाठी संधी दिली गेली.

जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे फिरते गाडी बगाड उदापूर येथील असुन, त्याच्या सुळ्याची उंची २१ फुट व त्यावरिल आडव्या आड्याची लांबी ४० फुट आहे. त्याच्या एका बाजुला पुजारी बसलेला असतो, तर दुसऱ्या बाजुला एक व्यक्ती बसते. त्या व्यक्तीला पकडुन दुसरी व्यक्ती हे बगाड गोल फिरवते. गाडी बगाडाला ओढण्यासाठी बैलाची जोडी जुपलेली असते.

भाविक जेव्हा बगाड फिरवताना तेव्हा खुपमोठा थरार अनुभवायला व पहायला मिळतो. तसेच ते फिरताना वर दुसर्‍या बाजूला बसलेला पुजारी शेंगा व खोबऱ्याची उधळन करतो. तो प्रसाद प्रप्त कण्यासीठी भाविकांची चढाओढ चालु असते. याच दरम्यान आमदार अतुल बेनके, माजी आमदार व उदापूरचे सुपुत्र दिलीप ढमढेरे व विघ्नहर अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी यात्रेस भेट देऊन सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

त्यानतंर गावामधून हे गाडीबगाड श्री काळभैरवनाथ मंदिरा परिसरात नेण्यात आले. व त्या मागोमाग वाड्या वस्त्यामधुन परंपरागत रित्या बैलगाड्या घेवुन यात्रेला आलेले भाविक मंदिर परिसरात बैलगाड्यानी येतात. मंदिर परिसरात भाविक भक्ताकडुन परत बगाड फिरवले गेले.

यावेळी मंदिरात तळीभंडार करून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात मंदिराच्या सज्जातून खोबऱ्याची व भंडार्याची मुक्तपणे उधळण करतात,सदानंदाचा येळकोट, भैरुनाथाचं चांगभलं, अंबाबाईचा उदे उदे या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता. व सर्वत्र भंडाऱ्याच्या उधळणीने परिसर एकदम पिवळट सोनेरी दिसत होता.

रात्रौ ९ वाजता छबिना व पालखी मिरवणूक उत्साहात व पारंपरिक वाद्यात काढण्यात आली. तदनंतर आकर्षक शोभेचे दारूची आतिष बाजी करण्यात आली.गायक सम्राट सुरेशकुमार लोणी धामणीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान यात्रा काळात ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फुलांची आकर्षक सजावट -

श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवा निमीत्त मंदिरात आकर्षक फुलाची सजावट मुंबई येथील गावातील रहिवासी रात्रभर जागून करतात. यामध्ये प्रामुख्याने सजावटी साठी देशी फुलांपासुन ते विदेशी फुले, वेली, पाने याचा वापर केला जातो. या वर्षी दादर फुलमार्केट व संत सावतामाळी मंडळ, मुंबई व उदापुरच्या सभासदाचे फुलसजावटीस विशेष सहकार्य होते. ही आकर्षक फुलींची सजावट पाहूण भाविक भक्त प्रसन्न झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com