
पुणे : ‘‘महाराष्ट्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात वाढ कशी होईल, यासाठी उद्योग संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. उद्योग-व्यवसाय वाढीसाठी राज्य सरकारचे धोरण प्रोत्साहनात्मक असून, अडचणीतील आणि बंद पडलेल्या उद्योगांना सुरू करण्यासाठी सरकारतर्फे सहकार्य करू,’’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.