निमंत्रित गोल्फ स्पर्धा

निमंत्रित गोल्फ स्पर्धा
Published on: 

फोटो ः उदयन माने

पुण्याचा उदयन माने आघाडीवर
निमंत्रित गोल्फ स्पर्धा

पुणे, ता. १८ ः ऑरो गोवा इगल गोल्फ क्लब आयोजित ऑरो रिॲल्टी निमंत्रित गोल्फ स्पर्धेत पुण्याचा उदयन मानेने सिक्स-अंडर ६५ अशी कामगिरीची करताना पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे.
येरवडा येथील पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ऍट्री मुंबई गरुडाज संघाच्या उदयन मानेने आठ बर्डी आणि दोन बोगी अशा कामगिरी केली. करणदीप कोचर आणि जोशुआ ग्रीन व्हिले-वुड या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सांघिक गटात आर्यन रूपा आनंद आणि शिव कपूर यांच्या आरव्हीआर दिल्ली ब्लू बुल्स संघाने ८-अंडर अशा कामगिरीसह आघाडीचे स्थान मिळवले. करणदीप कोचर आणि सी मुनियप्पाच्या कृष्णा पंजाब रॅपटर्स संघाने ७-अंडर कामगिरीसह दुसरा, तर उदयन मानेच्या ऍट्री मुंबई गरुडाज संघाने तिसरे स्थान राखले.
आज पहिल्या दिवस अखेर फिनिक्स हैद्राबाद संघाच्या राघव चुगसह चार प्रमुख खेळाडूंनी ३-अंडर ६८ अशा कामगिरीसह संयुक्त सहावे स्थान मिळवले. त्यामध्ये समर्थ द्विवेदी, सय्यद साकिब अहमद, चिराग कुमार या प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. मात्र, अव्वल खेळाडू गगनजित भुल्लरला २-अंडर ६९ अशा कामगिरीमुळे संयुक्त दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.