उद्धव ठाकरे मुलाला सांभाळा - किरिट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

किरिट सोमय्या यांनी पुण्यातील मानाच्या गणपतीसह इतर मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

उद्धव ठाकरे मुलाला सांभाळा - किरिट सोमय्या

पुणे - महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे अमंगल सरकार कायम स्वरूपी गेले आहे. आता स्वयं एकनाथ आणि देवेंद्र हे आता महाराष्ट्रात मंगलमय जीवन आणतील. तसेच ठाकरे यांचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे. डावा हातही जेलमध्ये जाईल. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाला सांभाळा अशा शब्दात भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी टीका केली.

किरिट सोमय्या यांनी पुण्यातील मानाच्या गणपतीसह इतर मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते.

मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. गेले अडीच वर्षाच महाराष्ट्र मागे गेला त्याला पुन्हा विकासाच्या पथावर न्यावे अशी प्रार्थना केली. ज्या दिवशी ठाकरे सरकार गेले त्या दिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपले आता स्वयं एकनाथ व देवेंद्र हे दोघे महाराष्ट्राचे मंगल करतील.

आज दुपारी मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे, अस्लम भाई यांनी केलेल्या १ हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने एक हजार कोटीचा घोटाळा केला आहे. मड आयलंड येथील रिसॉर्टला २१ फेब्रुवारी २०२१ ला पर्यावरण विभागाने तात्पुरती परवानगी दिली व त्यानंतर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ही परवानी २०२५ पर्यंत वाढवून दिली. मी याचा पुरावा दिला आहे. व पुरावा दिल्यानंतर काय होते हे संजय राऊत यांना विचारा, असा टोला सोमय्या यांनी मारला.

Web Title: Uddhav Thackeray Aditya Thackeray Kirit Somaiya Politics Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..