Video : कमी जागांमध्येही सत्तेचा चमत्कार आम्ही घडविला : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

''साखर उद्योग विषयावर काही चुकून बोललो तर त्याला माझ्या वडिलांचे मित्र जबाबदार असतील. ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला की उद्धव, तुला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल. ती व्यक्ती याला जबाबदार असेल. ती येथेच आहे, तुम्ही त्यांना जबाबदार धरू शकता,'' असे ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उल्लेख केला.

पुणे : ''राज्यात कमी आमदार असतानाही आम्ही सत्तेत आलो. सत्तेचा चमत्कार होऊ शकतो. आम्ही घडवून दाखवला. आता कुणी असे म्हणू नये की आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे आमचंच पीक येणार. आम्ही कमीत कमी जागांमध्येही तुमच्यावर मात करू शकतो'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आले एकत्र; काय झाली चर्चा?
 
''साखर उद्योग विषयावर काही चुकून बोललो तर त्याला माझ्या वडिलांचे मित्र जबाबदार असतील. ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला की उद्धव, तुला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल. ती व्यक्ती याला जबाबदार असेल. ती येथेच आहे, तुम्ही त्यांना जबाबदार धरू शकता,'' असे ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उल्लेख केला.

Video : पवारसाहेब, तुम्ही दुसरीही चूक केली असे मी म्हणणार नाही : उद्धव ठाकरे
 
पंतप्रधान मोदी यांनाही टोला

''वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मागील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले होते. या कार्यक्रमात मोदी यांनी 'मला बोट धरून शरद पवारांनी राजकारणात आणले, ''असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून ठाकरे म्हणाले, मी असे म्हणणार नाही की पवार यांनी एक चूक केली आणि दुसरीही चूक केली आहे.

अजित पवारांनी स्टेजवर बदलल्या नावाच्या पाट्या अन् शेजारी बसविले...
शेतकरी कर्ज मुक्त करणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Speaks About formation of government in Less seats