esakal | मुख्यमंत्री घेणार प्रशासनाची झाडाझडती 
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav-thackeray

कोविड केअर सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.मुख्यमंत्री हे कोरोनाविरोधातील यंत्रणेचा आढावा घेऊन नवी उपचार व्यवस्था उभारण्यासाठी पावले टाकण्याची आशा आहे.

मुख्यमंत्री घेणार प्रशासनाची झाडाझडती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग, रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था आणि नव्या रुग्णांना सामावून घेणारी यंत्रणा जाणून घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी गुरुवारी (ता. 30) संवाद साधणार आहेत. त्याचवेळी ज्या उपाययोजना कागदोपत्री राहिल्या आहेत आणि त्याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहे, या मुद्दयावरून ठाकरे प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यासह जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची संख्या त्याच प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यावर उपाययोजना करताना प्रशासन कमी पडत असल्याची ओरड आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाविरोधातील यंत्रणेचा आढावा घेऊन नवी उपचार व्यवस्था उभारण्यासाठी पावले टाकण्याची आशा आहे. 

महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""पुण्यात ज्या प्रमाणात नागरिकांची तपासणी होत आहे आणि नवे रुग्ण सापडत आहेत, त्यानुसार उपचार यंत्रणा आहे. त्यामुळे रुग्णांना गरजेनुसार उपचार मिळत आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राखीव खाटांबाबत काय ? 
कोरोनाची व्याप्ती वाढली तरी, खासगी हॉस्पिटलकडून बेड आणि उपचार खर्चाबाबत सहकार्य मिळत नाही, अशी तक्रार महापालिका आणि जिल्हा प्रशासनच करीत आहे. तेव्हाच, या हॉस्पिटलमधील 80 टक्के खाटा कोरोनासाठी राखीव ठेवण्याचे नियमाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यावर मुख्यमंत्री भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

महापौरांचा निधीसाठी आग्रह 
कोरोनावर उपाय करताना महापालिकेने आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपये खर्च केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगत आहे. यापुढे पुणेकरांना सुरक्षित ठेवताना राज्य सरकारने पुरेशा प्रमाणात निधी देण्याचा आग्रह मोहोळ यांनी धरला आहे. त्यावरही मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेण्याचा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

loading image
go to top