
पुणे : देशातील शिक्षण प्रणाली अधिक प्रभावी आणि काळानुरूप करण्यासाठी आता सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न महाविद्यालयांना त्यांच्या अभ्यासक्रमांचे तातडीने पुनरावलोकन सुधारित अभ्यासक्रम लागू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण व्यवस्थेतील काळानुरूप आमूलाग्र बदलांची नांदी येत्या शैक्षणिक वर्षापासून घातली जाण्याची चिन्हे आहेत.