उजनीचे पाणी आता पिण्यासाठीच राखीव

उजनीचे पाणी आता पिण्यासाठीच राखीव
Published on: 

उजनीचा फोटो घ्यावा
---------
उजनी धरणातून उद्यापासून बंद होणार पाणी
आता पाणी पिण्यासाठीच राखीव; दुष्काळामुळे शेतीसाठी आवर्तन अशक्यच

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : उजनी धरण सध्या ८४ टक्के (१०८.७३ टीएमसी) भरले असून, धरणात ४५ टीएमसी उपयुक्त साठा आहे. शेतीसाठी कालव्यातून सोडलेले पाणी उद्या (रविवारी) बंद केले जाणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असून, पुढील आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाण्याचे नियोजन ठरणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बीचे ४.४३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी जिल्ह्यात रब्बी हंगामात चार लाख ८३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केसुद्धा पाऊस झालेला नाही. उर्वरित दोन तालुक्यांमध्येही ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला, तोही सुरुवातीला. पाऊस कमी आणि पाणीपातळीही सरासरी तीन मीटरने खोल गेल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीचे पेरणीखालील क्षेत्र घटणार आहे. कारण, उजनी धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. शेतीसाठी दरवर्षी उन्हाळ्यात दोन ते तीन आवर्तने सोडली जातात; पण यंदा दुष्काळामुळे शेतीला कालव्यातून पाणी देणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, भीमा नदीतून पाणी सोडले जाईल, कारण सुमारे १०० ग्रामपंचायतींसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा नदीवर अवलंबून आहे, असेही अधिकारी म्हणाले. कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर होईल. त्यात शेतीसाठी पाणी सोडले जाणार की नाही, याची घोषणा होणार आहे.

चौकट
सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस
राज्यातील ३७ तालुक्यांमध्ये यंदा सरासरीच्या ५० टक्केसुद्धा पाऊस झालेला नाही. यात जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुक्यांचा समावेश आहे. त्यात उत्तर सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, पंढरपूर व सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या राज्यात १६५ आहे. यातही जिल्ह्यातील बार्शी व करमाळा या तालुक्यांचा समावेश आहे. गतवर्षी महापुराने बाधित झालेल्या संपूर्ण जिल्ह्यात यंदा खूपच कमी पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com