

NRK26A00651
शिरपूर (सो) (ता. मोहोळ) ः येथील उजनी कालव्याची लांबोटी वितरिकेची स्वच्छता करताना.
लांबोटी-विरवडे वितरिकेच्या स्वच्छतेस सुरुवात
चार वर्षांनंतर मोहीम; कालवा निरीक्षक दशरथ बनसोडे यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
नरखेड, ता. १० : उजनी धरणाच्या कालव्यांच्या वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व झाडे वाढल्याने धरणातून सोडलेले लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे लांबोटी व विरवडे वितरिकेची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कालवा निरीक्षक दशरथ बनसोडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
उजनी धरणाच्या कालव्यांची स्वच्छता चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर यंदा पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. लांबोटी वितरिका सुमारे १५ किलोमीटर लांबीची असून त्यात उंच गवत व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कालव्याला व वितरिकेला गळती लागून पाणी वाया जाते. परिणामी प्रवाहित पाण्याचा दाब कमी होऊन टेल ते हेड शेतकऱ्यांना पाणी समान प्रमाणात मिळत नाही. हा अडथळा दूर करण्यासाठी कालवा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
उजनी कालव्यांच्या वितरिकांवरून शेतकऱ्यांच्या काही पाइपलाइन गेल्या असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी त्या काढून घ्याव्यात, अन्यथा झालेल्या नुकसानीस भीमा पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पाणीपट्टी भरा, सहकार्य करा..!
उजनी कालवा लाभक्षेत्रातील पाणी वापरणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन कालवा निरीक्षक दशरथ बनसोडे यांनी पाटबंधारे विभागाच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.