पांगरी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आंबा बांबू बागेसह साहित्य जळीत
PGR26B03478, PGR26B03479
उक्कडगाव (ता. बार्शी) ः येथील शेतकरी अशोक मुळे, शुभांगी मुळे यांच्या शेतातील शॉर्टसर्किटमुळे जळालेली आंब्याची बाग.
उक्कडगावात शॉर्टसर्किटमुळे १३०० आंब्याची झाडे जळाली
पाच वर्षांपासूनचे बांबूचे बनही खाक; २५ लाखांचे नुकसान
पांगरी, ता. ३ ः उक्कडगाव (ता.बार्शी) येथील शेतकऱ्याच्या पांगरी हद्दीतील शेतात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत आंबा बागेतील १३०० झाडे, पाच वर्षांचे बांबू, स्प्रिंकलर पाइप, ड्रीप, तळ्याची ताडपत्री असे जळून २५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना काल सोमवारी (ता.२) सकाळी साडेदहा ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. याबाबत अशोक आबासाहेब मुळे (वय ७०, रा. उक्कडगाव) व त्याची सून शुभांगी मुळे असे शेतकऱ्यांची नावे आहेत.
फिर्यादी अशोक मुळे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून, अशोक मुळे व सुनेच्या संयुक्त नावावर गट क्रमांक १२ एकर जमीन असून, त्यापैकी ६ एकर क्षेत्रात आठ वर्षांची सुमारे १३०० आंब्याची झाडे तर ३ एकर क्षेत्रात पाचवर्षांची बांबूची लागवड आहे. सोमवारी सकाळी मुख्य वीजवाहिनीमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट होऊन शेतात आग लागून त्यात आंबा व बांबूची जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर फिनोलेक्स कंपनीचे ६० स्प्रिंकलर पाईप, आंबा व बांबूसाठीचे ठिबक सिंचन, शेततळ्यातील ताडपत्री, जैन कंपनीचा ४ इंचीचा शंभर मीटर लांबीचा पाईप जळून खाक झाला आहे.
या आगीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश दळवी करत आहेत.
घटनास्थळी विद्युत वितरण अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी आर. के. पुजारी, नारायण धस, महसूल सेवक अंकुश मुंढे, सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर यांनी पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

