उक्कलगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

उक्कलगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
Published on

उक्कलगावात तरुणाचा
संशयास्पद मृत्यू
खून झाल्याचा पोलिसांना संशय

श्रीरामपूर, ता. १७ ः तालुक्यातील उक्कलगाव येथे आशिष पारखे (वय २७) या तरुणाचा मृतदेह सकाळी घराच्या पडवीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. यामुळे खळबळ उडाली. आशिषच्या मानेवर मारहाणीच्या खुणा आढळल्याने त्याचा खून झाल्याचा संशय आहे. या संशयाला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांनी दुजोरा दिला आहे.

आशिष रात्री घराच्या पडवीत झोपला होता. त्याचा मोठा भाऊ शेजारीच रहात असून, त्याचा लहान भाऊ काल रात्री शिर्डीहून घरी आला होता. सकाळी कुटुंबीयांना आशिष झोपलेल्या अवस्थेतच दिसून आला. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता तो मृत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्राथमिक पाहणीत आशिषच्या मानेवर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून, घटनास्थळी लाकडी दांडाही आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर दांड्याने हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. खून कशामुळे आणि कोणी केला, हे उत्तरीय व फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com