

उल्हासनगर मेट्रोला अखेर गती!
उल्हासनगर, ता. ५ : ‘मुंबई मेट्रो-५’च्या दुसऱ्या टप्प्यात भोईरवाडी ते उल्हासनगर या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे शहराच्या विकासाला नवे पंख मिळणार आहेत. तसेच उल्हासनगरला आधुनिक, जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ‘मुंबई मेट्रो-५’च्या दुसऱ्या टप्प्यातील भोईरवाडी ते उल्हासनगर या मार्गावरील विविध कामांसाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये मेट्रो व्हायाडक्ट, एलिव्हेटेड स्थानके, आर्किटेक्चरल फिनिशिंग, प्री-इंजिनिअर्ड स्टील रूफ स्ट्रक्चर तसेच अन्य महत्त्वाच्या बांधकामांचा समावेश आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो विस्तारामुळे भोईरवाडी, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित व आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.