esakal | उमाजी नाईक यांचे स्मारक चकाचक
sakal

बोलून बातमी शोधा

उमाजी नाईक स्मारक

उमाजी नाईक यांचे स्मारक चकाचक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गराडे भिवडी (ता. पुरंदर) : येथील आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या स्मारकाची अनेक वर्ष दुरवस्था झाली होती. गाजरगवत वाढल्याचे व स्मारकाची झालेल्या दुरवस्थेबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले अन्‌ ग्रामपंचायतीने त्वरित स्वच्छता करून स्मारक परिसर चकाचक केला.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर रोजी आहे. या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनाचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी स्मारकाची पाहणी केली. या अगोदर स्मारकाची स्वच्छता शासनाने करावयाची की ग्रामपंचायतीने का रामोशी संघटनांनी करावयाची हा वादाचा मुद्दा होता. पण यावर्षी तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी ही स्मारकाची जबाबदारी आता ग्रामपंचायतीवर सोपवल्यामुळे महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे दौलतनाना शितोळे यांनी सांगितले. यावर्षी उमाजी नाईक यांची जयंती ग्रामपंचायतीच्या वतीने जयंती साजरी केली जाणार आहे. दुपारी बारा वाजता मानवंदना होणार आहे. त्यामुळे राज्यातील संघटनाचे अध्यक्ष व मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळाचा विचार करून उपस्थिती दाखवावी.

हेही वाचा: नगरसेविका बारसे यांचा आमदार लांडगे यांना घरचा आहेर

यावेळी राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव, राज्याच्या महिला अध्यक्ष सुजाता जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष साहेबराव जाधव, जिल्हा युवक कार्याध्यक्ष अमृत भांडवलकर, दीपक चव्हाण, बापूराव खोमणे, राजे उमाजी नाईक यांचे सातवे, वंशज चंद्रकांत खोमणे, उपसरपंच राहुल मोकाशी, सुधीर नाईक, विजय भिंताडे, संजय दिघे, सुधीर कदम, सागर मोकाशी, दिलीप जाधव, नीलेश जाधव, सतीश जाधव, संदीप भांडवलकर, लखन चव्हाण, तुषार खोमणे, दीपक चव्हाण, चन्नवीर जामदार आदी उपस्थित होते.

loading image
go to top