
पुणे : शहरात किती ‘होर्डिंग’ अनधिकृत आहेत, हे विचारल्यानंतर मला अधिकाऱ्यांनी २४ इतका आकडा सांगितला. यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे शहरातील ‘होर्डिंग’ची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करणार आहे. जर यात जास्त अनधिकृत ‘होर्डिंग’ सापडले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे,’’ असा इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला.