

School Admission Alert: 45 Schools in Pune District Declared Unauthorized
Sakal
पुणे : पुणे महापालिकेसह पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषदेने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांची एकत्रित यादी जाहीर केली आहे. यात पुणे महापालिकेच्या हद्दीतील १२, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नऊ शाळा अनधिकृत आहेत. तर ग्रामीण भागातील २४ शाळा अनधिकृत असून त्यापैकी १३ शाळांना शासन मान्यता नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.