

Farmers say continued dry spells could reduce cultivation area and push up Indrayani rice prices in the coming months.
Sakal
कोपर्डे हवेली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोपर्डे हवेलीसह परिसरातील भातलागवडीचे क्षेत्र घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाची अनिश्चितता, वेळेवर न झालेला पाऊस आणि भाताच्या रोपांची खुंटलेली वाढ यामुळे शेतकरी चिंतेत असून लागवडीचा वेगही मंदावला आहे. पावसाने पुन्हा दगा दिल्यास भात उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम इंद्रायणी तांदळाच्या दरावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.