crime
Esakal
पुणे - रविवार पेठेतील एका सराफा कारागिराच्या घरातून भरदिवसा सव्वादोन कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीला खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन किलो दोनशे ग्रॅम सोन्यासह अतिरिक्त ४६ ग्रॅम, असे मिळून सव्वादोन कोटी रुपयांचे दोन किलो २४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.