उंडाळे. उंडाळकर विद्यालयात अभिनव पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.
उंडाळकर विद्यालयात अनाेखी हाेळी
उंडाळे, ता. ४ ः येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने व एस. आर. दळवी फाउंडेशन, निसर्ग व सामाजिक पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अभिनव पद्धतीने होळी करण्यात आली. होळीतील प्रतिकात्मक राक्षसाचे दहन प्राचार्य बी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले.
पर्यवेक्षक जे. एस. माळी, धनंजय पवार, डी. बी. जाधव, शंकर आंबवडे, प्रदीप ओंबासे, रवींद्र भोये, अनिल सुतार, ए. जे. पाटील, एस. आर. पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून जमा केलेल्या कचऱ्यातून राक्षस तयार केला. या वेळी विद्यार्थ्यांनी होळी लहान करा पुरणपोळी दान करा, वाईट व्यसने दान करा अशा घोषणा देत फेरी काढली. राक्षसाचे दहन केले. यावेळी धनंजय पवार यांनी या होळीच्या निमित्ताने अभिनव पद्धतीने होळी कशी साजरी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
A00832
उंडाळे ः अभिनव पद्धतीने होळी करताना विद्यार्थी.
...................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

