उंडाळे. दि इंग्लिश मीडियम स्कूलचे आंतरराष्ट्रीय कला, स्पर्धेत यश
उंडाळेच्या स्कूलचे आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत यश
शाळेने वर्ल्ड एज्युकेशन प्रेस्टीज अवॉर्डसह मिळवले ४.५/५ मानांकन
उंडाळे, ता. २२ : रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत येथील दि इंग्लिश मीडियम स्कूलच्या ३६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले, तसेच शाळेला वर्ल्ड एज्युकेशन प्रेस्टीज अवॉर्डसहित ४.५/५ मानांकन मिळाले आहे.
नॅशनल लेवल स्पर्धेसाठी एकूण १७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये ५५ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली. त्यामध्ये एकूण ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कला स्पर्धेमध्ये चित्रकला, रंगभरण, व्यंगचित्र काढणे अशा अनेक स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच शाळेच्या क्रीडांगणावर मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामीण रुग्णालय, उंडाळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर कोगनुळकर प्रमुख पाहुणे, तर ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, संचालक रमेश शेवाळे, बाबूराव चोपडे, शामराव पाटील वसतिगृहाचे अधिक्षक कृष्णत थोरात आदी उपस्थित होते.
स्पर्धेत राज साळुंखे, अनुजा पाटील, राधिका पाटील, राही माळी, आराध्या थोरात, अभंग शेवाळे, अन्वी चाळके, साईराज मोरे या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक, तर आठ विद्यार्थ्यांना आर्ट मायस्ट्रो अवॉर्डने सन्मानित करण्यात आले, तसेच १४ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पदकाने गौरवण्यात आले. सहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
यावेळी डॉ. कोगनुळकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहात आपल्याकडे असलेल्या कला जोपासण्याचा सल्ला दिला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्थापिका गीतांजली पाटील यांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी श्री. वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
क्रीडा शिक्षक पी. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. रूपाली पाटील यांनी आभार मानले.
---------------------------------
00847
उंडाळे : येथे स्कूलच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करताना मान्यवर.
-----------------------------------

