

उंदरगाव-केवड रस्त्यावर खड्डेच खड्डे
उंदरगाव, ता. २८ : माढा-मालवंडी रोडवरील उंदरगाव ते जामगाव रस्त्याची गेल्या सात-आठ महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, डांबरीकरण उखडल्याने खडी रस्त्यावर पसरली आहे. सीना नदीवरील पुलाचीही अवस्था खराब झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची नियमित वाहतूक होत असल्याने खराब रस्त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे.
कोट
- खराब रस्त्यामुळे दुचाकीवर प्यायला पाणी दोन घागरी घेऊन निघालो, तर खड्ड्यांमधून जाताना घरापर्यंत एकच घागर पाणी राहते. सात-आठ महिन्यांपासून रस्त्याची हीच अवस्था आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.”
- शुभम नाईकवाडे, उंदरगाव
- तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबत सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ठेकेदारांकडून याबाबत समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. डांबराचे दर वाढल्याचे कारण ठेकेदारांकडून पुढे केले जात आहे. वरिष्ठ स्तरावरून हे काम काढून घेऊन अन्य सक्षम यंत्रणेकडे दिल्यास काम तात्काळ पूर्ण करून घेतले जाईल.
-डी. ई.मिटकरी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.