Undawadi News : फळे, धान्य नव्हे; आता थेट शेतातील सुपीक मातीचीच चोरी!

शेतातील फळे, भाजीपाला, वस्तू अथवा अन्नधान्य चोरीला गेल्याच्या घटना आतापर्यंत ऐकायला मिळत होत्या.
Theft of fertile farm soil

Theft of fertile farm soil

sakal

Updated on: 

उंडवडी - शेतातील फळे, भाजीपाला, वस्तू अथवा अन्नधान्य चोरीला गेल्याच्या घटना आतापर्यंत ऐकायला मिळत होत्या. मात्र, आता थेट शेतातील सुपीक मातीच चोरीला जाऊ लागल्याची धक्कादायक वस्तुस्थिती उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे समोर आली आहे.

येथील गट क्रमांक ११७, ११८ व ११९ मधून २६ व २७ सप्टेंबर रोजी अंदाजे २०० ते ४०० ब्रास माती जेसीबीच्या साहाय्याने उकरून डंपरमधून वाहून नेण्यात आली आहे. घटनास्थळी जेसीबीच्या खोदकामाच्या खुणांसह डंपरच्या चाकांचे ठसे स्पष्ट दिसत असून, याप्रकरणी शेतकरी मुरलीधर शामराव महाडीक यांनी सुपे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com