
Thieves break into a locked house in Undawadi, steal gold and cash in broad daylight.
Sakal
उंडवडी : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) हद्दीतील तळपट्टी येथील अशोक श्रीरंग जराड यांच्या घरात भरदिवसा चोरीची घटना आज (सोमवारी) दुपारी दोनच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडले व घरातील २४ हजार रुपये रोकड तसेच सुमारे एक तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.