शालेय बास्केटबॉल स्पर्धा

शालेय बास्केटबॉल स्पर्धा
Published on

डेक्कन जिमखाना क्लब ः बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील मुलीच्या गटाच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कूल आणि वॉलनट स्कूल शिवणे यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.
-----------
सरदार दस्तूर, सेंट जोसेफ, अमानोरा, दिल्ली पब्लिक स्कूल उपांत्य फेरीत
शालेय बास्केटबॉल स्पर्धा


पुणे, ता. १७ ः शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित सतरा वर्षांखालील मुलीच्या गटाच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत पाषाणच्या सेंट जोसेफ स्कूल, सरदार दस्तूर, अमानोरा स्कूल आणी दिल्ली पब्लिक स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त करीत उपांत्य फेरी गाठली आहे.
डेक्कन जिमखाना क्लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत समृद्धी धुमाळ व श्रेया गुदगेने केलेल्या (प्रत्येकी १० गुण) सुरेख खेळाच्या जोरावर सरदार दस्तूर नौशेरखान प्रशालेने होलिओस इंन्टरनॅशनल स्कूलवर ३४-११ असा २३ गुणांनी विजय मिळविला मध्यंतरांस त्यांनी २२-५ अशी सतरा गुणांची आघाडी मिळवली होती. पराभूत संघाच्या अरणा नांगरे (६ गुण) व शुभ्रा मुरकुटेने केलेली खेळी अपुरी ठरली.
हेतवी अमिन (७ गुण) आणि अनुषा सोनटक्केने (६ गुण) केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पाषाणच्या सेंट जोसेफ प्रशालेने बाणेरच्या विद्याचंल स्कूलचा १९-८ असा अकरा गुणांनी पराभव केला. मध्यंतरांस त्यांनी ११-२ अशी नऊ गुणांची मिळविलेली आघाडी उपयुक्त ठरली. पराभूत संघाच्या पूर्वा इंगवलेने केलेली खेळी अपुरी ठरली.
दिल्ली पब्लिक स्कूलने शिवणेच्या वॉलनट स्कूलवर २०-७ असा तेरा गुणांनी विजय मिळविला. मध्यंतरांस त्यांनी ९-४ अशी पाच गुणांची मिळविलेली आघाडी उपयुक्त ठरली. यावेळी विजयी संघाकडून रावी लोंढे व आरामा धर (प्रत्येकी ६ गुण) तर पराभूत संघाकडून हेतल इनानीने (७ गुण) जोरदार खेळ केला.
रिभा बिरनाळेच्या (९ गुण) सुरेख कामगिरीच्या जोरावर हडपसरच्या अमानोरा स्कूलने एसपीएम पब्लिक स्कूलचा ११-४ असा सात गुणांनी पराभव केला मध्यंतरांस त्यांनी ९-४ अशी पाच गुणांची आघाडी संपादली होती. यावेळी पराभूत संघाच्या पर्णवी कुलकर्णीने केलेली खेळी अपुरी ठरली.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com