आई बापासाठी वेळ द्या- प्रा. हंकारे
PTK26B01023
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर ) येथे बाप समजून घेताना या कार्यक्रमात बोलताना प्रा. वसंत हंकारे यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ.
..........
आई-बापासाठी वेळ द्या: प्रा. वसंत हंकारे
..........
पटवर्धन कुरोली महाविद्यालयातर्फे ‘बाप समजून घेताना’वर व्याख्यान
..........
पटवर्धन कुरोली, ता. २५ : तुम्ही आयपीएलच्या रनांचा हिशोब ठेवता, ज्या आई-बापाने आपल्याला जन्म दिला अंगा-खांद्यावर खेळवले, त्या आई-बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहेत. याचा हिशोब तुम्ही कधी करणार आहात, कारण आज हिशोब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल, असे प्रा. वसंत हंकारे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर ) येथे पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित बाप समजून घेताना या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री हंकारे म्हणाले, की भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका, त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आई-बाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद हंकारे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशालेचे संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.
चौकट
प्रा. हंकारेंना दिली पोर्ट्रेट पेंटिंगची भेट
प्रशालेतील कला शिक्षक नामदेव देशमुख यांनी हंकारे यांचे काढलेले जल रंगातील पोर्ट्रेट पेंटिंग त्यांना भेट देण्यात आले, एवढा खास फोटो पाहून श्री. देशमुख यांचे हंकारे यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

