esakal | पाऊस झाला की, हांडेवाडी रस्ता होतो जलमय | Undri
sakal

बोलून बातमी शोधा

हांडेवाडी रस्ता जलमय

Undri : पाऊस झाला की, हांडेवाडी रस्ता होतो जलमय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : महापालिकेमध्ये गेल्यानंतर किमान सुविधा तरी मिळतील, अशी आशा स्थानिक नागरिकांना होती. मात्र, अद्यापही पाऊस झाला की, हांडेवाडी रस्ता जलमय होत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याची व्यथा स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी दै. सकाळशी बोलताना मांडली.

मागिल १५ वर्षांपूर्वी हिंद कॉलनीसमोर रहमनी कॉलेजजवळील इनामदारनगर हांडेवाडी रोड (प्रभाग क्र. २६) हा परिसर महापालिकेमध्ये समाविष्ट झाला आहे. मात्र, रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधासुद्धा अद्याप मिळल्या नाहीत. महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे वारंवार तोंडी आणि लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, या परिसरातील समस्या सोडविण्याऐवजी निवेदनाला कायम केराची टोपली दाखवली जात आहे.

हेही वाचा: Chipi Airport Live: राणेंच्या विमानातून शिवसैनिकांचा प्रवास

निवडणुका आल्या की प्रत्येकजण स्थानिक समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल, या परिसराचा विकास केला जाईल, अशी आश्वासने देतात. निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परिस्थिती असल्याचे शराफत पानसरे, विकास भुजबळ, खंडेराव जगताप, गणेश वाडकर, सुमित नेवसे, रामेश्वर तोडकर, धर्मराज म्हेत्रे यांनी सांगितले.समस्या सूटत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुले घरी येईपर्यंत जीव टांगणीला

ससाणेनगर रेल्वे गेट ते हांडेवाडी चौक दरम्यान, श्रीराम चौक, रहमनी कॉलेजजवळ, इनामदार नगर, हिंद कॉलनीसमोरील सखल भागामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचते. वारंवार तक्रारी करूनसुद्धा येथे पावसाळी वाहिनीचे काम झाले नाही. नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तोंडी आणि लेखी तक्रार केली आहे. या परिसरामध्ये मोठ्या टाऊनशीप असून, शाळा-महाविद्यालये असल्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका असल्याने मुले घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागत आहे.

loading image
go to top