
पुणे : शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच हजाराच्या आत मिळकतकर असणे अनिवार्य करण्याची अट महापालिका प्रशासनाने टाकली होती. पण ही अन्यायकारक व चुकीची अट आता बाद केली जाणार आहे. ही अट काढून टाकण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ‘सकाळ’ने याबाबत वृत्त देत पुणेकारांच्या आरोग्याचा हक्क डावलला जात असल्याचे समोर आणले होते.